Saturday, June 27, 2020

अनुस्वार कुठे आणि म् (हलन्त) कुठे?

अनुस्वार कुठे आणि म् (हलन्त) कुठे?

     संस्कृतवाक्यरचना करताना शब्दाच्या शेवटच्या अक्षरावर अनुस्वाराचे उच्चारण आल्यास बऱ्याच विद्यार्थ्यांचा किंबहुना काही शिक्षकांचाही ‘येथे अनुस्वार द्यायचा की... हलन्त (म्) करायचे?’ असा गोंधळ उडालेला मी पाहिला आहे. त्याच दुविधेचे समाधान करण्याचा प्रयत्न येथे केला आहे....

    नमस्कार मित्रांनो,

लक्ष्यवेध संस्कृत अकॅडेमीच्या या ब्लॉग वर तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, आम्ही या ब्लॉगच्या माध्यमातून सामान्यातिसामान्य विद्यार्थ्याला संस्कृतव्याकरण , वाक्यरचना, इ. संबंधी जे प्रश्न पडतात त्यांचे समाधान करण्याचा प्रयत्न करत असतो... असाच एक प्रयत्न आज ही...

(कृपया, तज्ज्ञ शिक्षकांनी आमच्या स्पष्टीकरणात काही दोष/कमतरता आढळल्यास आम्हाला नक्की कळवावे आणि स्पष्टीकरण समाधानकारक असेल तर Comments मध्ये प्रोत्साहन द्यावे...)

 

चला तर मग...

१. संस्कृतवाक्य रचना करतांना - पुढील शब्द जर स्वराने सुरु होणारा असेल तर ‘म् अन्यथा व्यंजनाने सुरु होणारा असेल तर अनुस्वार...

 

सर्वप्रथम आपण म् कुठे करायचा ते पाहू...

उदा. १. रामः वनम् आगच्छति|

२. गणेशः चित्रम् ईक्षते|

३. नेहा फलम् आनयति|

वरील वाक्यात वनम्, चित्रम्, फलम् या सर्व शब्दांचा शेवट म् ने केला आहे कारण, त्यांच्या पुढे आलेले गच्छति, ईक्षते, नयति हे शब्द(क्रियापद) स्वरादि म्हणजे स्वराने सुरु होणारे आहेत....

 

आता, आपण अनुस्वार कुठे द्यायचा ते पाहू...

उदा. १. रामः वनं गच्छति|

२. गणेशः चित्रं पश्यति|

३. नेहा फलं नयति|

वरील वाक्यात वनं, चित्रं, फलं या सर्व शब्दांवर अनुस्वार दिला आहे कारण, त्यांच्या पुढे आलेले गच्छति, पश्यति, नयति हे शब्द व्यंजनाने सुरु होणारे आहेत....

थोडक्यात असे म्हणता येईल की...

...पुढील शब्द जर स्वराने सुरु होणारा असेल तर ‘म् अन्यथा व्यंजनाने सुरु होणारा असेल तर अनुस्वार...

 

२. या ठिकाणी म् अनिवार्य आहे -

अ. वाक्याचा शेवट करताना-

म्हणजे दंड(|)च्या आधीच्या शब्दात शेवटच्या अक्षरावर अनुस्वार असल्यास तिथे म् करावा.

 

उदा.

जलं विना जीवनम् अशक्यं| येथे अनुस्वार देणे अयोग्य आहे.

जलं विना जीवनम् अशक्यम्| हे बरोबर आहे.

 

आ. ‘तो’ एकटा असेल तर-

    एखाद्या वाक्यात एखादा शब्द अनुस्वारयुक्त आहे पण जेव्हा तुम्ही तो शब्द एकटा लिहिता तेव्हा मात्र त्या शब्दाच्या शेवटी अनुस्वारा ऐवजी ‘म्’ लिहावे.

जसे फळ्यावर (बोर्डवर) किंवा वहित लिहित असताना

उदा. अहं सत्वरं भोजनं करोमि|

यातील शब्द वहित किंवाळ्यावर शब्दार्थ किंवा काही निर्देश करताना एक-एकटे लिहिले तर अनुस्वार ऐवजी म् करावे.

 

जसे शब्दार्थ लिहिताना-

१. अहम् - मी

२. सत्वरम् – चटकन

३. भोजनम् – जेवण

४. करोमि – करतो

 

जसे शब्दरूप ओळखताना-

१. अहम् – अस्मद् या उत्तमपुरुषी, तिन्ही लिंगी समान सर्वनामाचे प्रथमा एकवचन

२. भोजनम् – भोजन या नपुं लिंगी नामाचे प्रथमा द्वितीय एकवचन. इ.

 

३. अन्वय लिहिताना-

    बऱ्याच वेळा असे लक्ष्यात आले आहे कि काही शिक्षक अन्वय लिहिताना प्रत्येक अनुस्वार युक्त शब्दाबद्दल म् देण्याचा अट्टाहास करतात. पण ते तर्कसंगत वाटत नाही. कारण अन्वय म्हणजे काय तर वाक्य रचना सरळ कर्ता- कर्म च्या क्रमाने करणे होय. म्हणून अन्वय लिहितानाही वाक्यारचनेच्या नियमांचे पालन व्हावेच. तिथे तो केवळ अन्वय आहे म्हणून प्रत्येक अनुस्वार युक्त शब्दाच्या ठिकाणी म् युक्त शब्द लिहिणे योग्य नाही.

 

तर... अश्याप्रकारे अनुस्वार कुठे आणि म् (हलन्त) कुठे? या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला समाधानकारक मिळाले असेल अशी अपेक्षा आहे.

जर तुम्हाला हे स्पष्टीकरण समजले/आवडले असेल तर कृपया आमच्या या ब्लॉगला Follow करा कि जेणे करून तुम्हाला अश्याच उपयोगी पोस्ट पुढेही वाचायला मिळतील....

 

आणि हो... ही पोस्ट तुम्हाला कशी वाटली ते Comments मध्ये  नक्की कळवा...

 

भेटू मग, पुढील पोस्ट मध्ये...

धन्यवाद!!!


18 comments:

  1. अनुस्वार कुठे आणि म् (हलन्त ) कुठे?
    ह्या दुविधेचे समाधान खूप चांगल्या प्रकारे मांडलात सर.
    आणि तूम्हची हि पोस्ट खूप खूप छान आहे समजून घेण्यासाठी
    आणि मला हि पोस्ट समजली. Thank you sir for hi post banvnyasathi thanks alot

    ReplyDelete
  2. छान उपक्रम हाती घेतला आहे तुम्ही.
    खरच अभिनंदन तुमचे.

    ReplyDelete
  3. सोप्या भाषेत फारच सुंदर आणि उपयुक्त विवेचन. अशीच माहिती देत रहा.👍

    ReplyDelete
  4. छान माहिती...
    ज्याला संस्कृत भाषेचे ज्ञान नाही ..त्या ही व्यक्तीला
    समजेल अशी सोपी आणि सरळ शब्दरचना...

    ReplyDelete
  5. Nice information sir
    Thank you.

    ReplyDelete
  6. Information is so nice sir next post pan taka aalyvar

    ReplyDelete
  7. Nice explaination ,thanks for your post.

    ReplyDelete