Thursday, June 18, 2020

वर्ग १०वी साठी हे ९ गुण- खूप सोपे आहेत मिळवण्यासाठी

नमस्कार विद्यार्थी मित्रांनो,
लक्ष्यवेध संस्कृत अकॅडेमीच्या या  ब्लॉगवर तुम्हा सर्वांचे स्वागत आहे.!!!
       आज या #Corona_Pandemic च्या काळात सर्वच क्षेत्रावर परिणाम झाला आहे. त्यात शिक्षण क्षेत्रही अलिप्त नाही. शाळा, महाविद्यालय, क्लासेस, विश्वविद्यालय सर्वच बंद आहेत. अशा या संकटाच्या काळातही शिक्षण क्षेत्रात कार्य करणारे काही उत्साही व हाडाचे शिक्षक आहेत जे विद्यार्थ्यांना नेहमी अभ्यासात गुंतवून ठेऊ इच्छितात अश्या त्या सर्व शिक्षकांना हाथभार लावण्यासाठी आणि विद्यार्थ्यांना संस्कृत विषयात पैकी च्या पैकी गुण मिळवण्यास साहाय्य करण्यासाठी आम्ही नेहमी तत्पर आहोत. त्यासाठीच हा छोटासा प्रयत्न आहे...

       मित्रांनो, आजच्या पोस्टमध्ये आपण #दशमी_कक्षा #संस्कृत_आमोदः च्या पेपरमध्ये थोड्याश्या प्रयत्नाने किंबहुना खूप कमी कष्टाने ९ गुण कसे मिळावता येतील ते पाहू...

१. तुम्हाला मोजता येते का?
       कृतीपत्रिकेतील विभाग १ सुगम संस्कृतम् मधील कृती ( इ ) सङ्ख्याः अक्षरैः /अङ्कैः लिखत| हा प्रश्न 2  गुणांसाठी आहे.
वर्ग ८वी पासून आपण संस्कृतातील संख्यांचा अभ्यास केला आहे. वर्ग ८वी ला १ ते ५० व  वर्ग ९वी ला १  ते १०० पर्यंत संख्या दिलेल्या आहेत त्याच संख्यांचा सराव तुम्हाला १० बोर्ड परीक्षेत 2 गुण मिळवून देणारा आहे...

संख्यांचा सराव कसा करावा?
१. शाळेत पुस्तकातील पानक्रमांक सांगत असताना.
२. हजेरी क्रमांक सांगत असताना..
३. Mobile क्रमांक सांगत असताना. इ.


२. पाठाचे नाव लक्ष्यात आहे का?
       कृतीपत्रिकेतील विभाग २ म्हणजे गद्य विभाग मधील अवबोधनम् ची जी कृती आहे त्यात एक प्रश्न असा आहे ज्यात तुम्हाला केवळ एका वाक्यात पाठाचे नाव लिहिले कि मिळाला तुम्हाला १ गुण.
कसे?
बघा प्रश्न असेल , एषः गद्यांशः कस्मात् पाठात् उद्धृतः? या प्रश्नाचे उत्तर लिहित असताना दिलेला गद्यांश कोणत्या पाठातील आहे त्या पाठाचे नाव लिहायचे आहे. जसे,
       १. एषः गद्यांशः 'आद्यकृषकः पृथुवैन्यः' इति पाठात् उद्धृतः|
       २. एषः गद्यांशः 'व्यसने मित्रपरीक्षा' इति पाठात् उद्धृतः|
       ३. एषः गद्यांशः 'अमूल्यं कमलम्' इति पाठात् उद्धृतः|
       ४. एषः गद्यांशः 'स एव परमाणुः' इति पाठात् उद्धृतः|
       ५. एषः गद्यांशः 'धेनोर्व्याघ्रः पलायते|' इति पाठात् उद्धृतः|
       ६. एषः गद्यांशः 'आदिशङ्कराचार्यः' इति पाठात् उद्धृतः|
       ७. एषः गद्यांशः 'प्रतिपदं संस्कृतम्' इति पाठात् उद्धृतः| 
गद्य विभागात तुम्हाला केवल याच ७ पाठाचे गद्य येतील. म्हणून वरील सर्व वाक्यांचा चांगला सराव करा. आणि हे वाक्य आत्ताच तुमच्या वहित लिहून घ्या.

३. जालरेखाचित्रं पूरयत| एकूण गुण ६
       ही कृती तुम्हाला विभाग २ , ३ , व  ६ या तीनही विभागात येणार असल्याने २+२+२ असे ६ गुण देणारी ही कृती आहे'  गद्यपाठ असो व पद्यपाठ असो जालरेखाचित्र पूर्ण करत असताना तुम्हाला पाठात आलेल्या शब्दांचा विचार करावा लागतो. सामान्यतः या प्रश्नाचे उत्तर लिहित असताना पाठात आलेले उत्तर हे समान विभक्ति आणि समान वचनात असतात. जर तुम्ही पाठ नीट वाचला असेल तर तुम्हाला या प्रश्नांचे उत्तर सहज लिहिता येते.

उदा.


                         पुरुषः परीक्ष्यते                                 
|                       |                        |                         |
........             ...........           .............               कर्मणा

वरील श्लोकात पुरुषः परीक्ष्यते च्यानंतर श्रुतेन शीलेन गुणेन आणि कर्मणा असे समान विभक्ति व समान वाचनात हे शब्द आलेले आहेत.
वरील जालरेखाचित्रं पूरयत| चे उत्तर काय येईल याची तुम्हाला कल्पना आली असेलच...


असेच पुस्तकातील सर्व  जालरेखाचित्रं पूरयत| चे प्रश्न एका जोड पेज वर काढून घ्या आणि त्यांचा सराव करा. नक्की तुम्हाला या प्रश्नाचे पूर्ण गुण मिळतीलच...!!!
जर तुम्हाला वरील जालरेखाचित्रं पूरयत|  चे उत्तर कळले असेल तर तुम्ही ते आम्हाला comments मध्ये सांगायला विसरू नका.


अश्या प्रकारे तुम्हाला ९ गुण मिळालेत असे समजा...!!!
वरील स्पष्टीकरणात काही कळाले नसेल तर कृपया आम्हाला comments मध्ये सांगा.
कळाले असेल तर कृपया इतरांना हि पोस्ट पाठवा.
आणि हो आमच्या पेजला Follow करायला विसरू नका.

भेटू पुढील पोस्ट मध्ये.

धन्यवाद....!!!

1 comment: