Saturday, April 3, 2021

२०२०-२०२१ बोर्डाने दिलेल्या मराठीच्या प्रश्नपेढीतील भाषाभ्यास चे उत्तर.

 वर्ग नववी व दहावी साठी आवश्यक तो भाषाभ्यास …

२०२०-२०२१ बोर्डाने दिलेल्या प्रश्नपेढीतील मराठी कुमारभारतीतील भाषाभ्यासाची उत्तर खालील प्रमाणे आहेत.


कर्मधारय समास

 नीलकमल - नील असे कमल

 महाराष्ट्र - महान असे राष्ट्र

 भाषांतर - अन्य भाषा

 पांढराशुभ्र - शुभ्र असा पांढरा

 घननीळ - घना सारखा निळा

 श्यामसुंदर - सुंदर असा शाम

 कमलनयन - कमळासारखे डोळे 

नरसिंह - सिंहासारखा नर 

विद्याधन - विद्या हेच धन

रक्तचंदन - चंदनासारखा रक्त/ लाल

 घनश्याम - घनासारखा शाम

 काव्यामृत - काव्यरूपी अमृत

 पुरुषोत्तम - उत्तम असा पुरुष 

महादेव - महान असा देव


इतरेतर द्वंद्व समास

बहिणभाऊ - बहीण आणि भाऊ

आईवडील - आई आणि वडील 

नाकडोळे - नाक आणि डोळे 

सुंठसाखर - सुंठ आणि साखर 

कृष्णार्जुन - कृष्ण आणि अर्जुन 

विटीदांडू - विटी आणि दांडू 

कुलुपकिल्ली - कुलूप आणि किल्ली 

स्त्री-पुरुष - स्त्री आणि पुरुष

वैकल्पिक द्वंद्व समास

बरेवाईट - बरे किंवा वाईट 

सत्यासत्य - सत्य किंवा असत्य 

चारपाच - चार किंवा पाच 

तीनचार - तीन किंवा चार 

खरेखोटे - खरे किंवा खोटे


समाहार द्वन्द्व समास

अंथरूणपांघरूण - अंथरूण, पांघरूण वगैरे 

भाजीपाला भाजी, पाला वगैरे 

कपडालत्ता कपडा, लत्ता वगैरे 

अन्नपाणी - अन्न, पाणी वगैरे 

पालापाचोळा - पाला, पाचोळा वगैरे 

केरकचरा - केर, कचरा वगैरे


द्विगु समास

पंचारती - पाच आरत्यांचा समूह 

त्रिभुवन - तीन भूवनांचा समूह 

नवरात्र - नऊ रात्रींचा समूह 

सप्ताह - सात दिवसांचा समूह  

अष्टाध्यायी - आठ अध्यायांचा समूह 

पंचपाळे - पाच पाळ्यांचा समूह 

द्विदल - दोन दलांचा समूह 

बारभाई - बारा भाईंच्या समूह 

त्रैलोक्य - तीन लोकांचा समूह



शब्दसिद्धी

अवघड - उपसर्गघटित शब्द

अवकळा - उपसर्गघटित शब्द

भरजरी - उपसर्गघटित शब्द

भरधाव - उपसर्गघटित शब्द

भरदिवसा - उपसर्गघटित शब्द

निरोगी - उपसर्गघटित शब्द

निनावी - उपसर्गघटित शब्द

निकोप - उपसर्गघटित शब्द

अतिरेक - उपसर्गघटित शब्द

अतिशय - उपसर्गघटित शब्द

उपसंपादक - उपसर्गघटित शब्द

उपमुख्याध्यापक - उपसर्गघटित शब्द

उपप्रमुख - उपसर्गघटित शब्द

उपवास - उपसर्गघटित शब्द

बेडर - उपसर्गघटित शब्द

बेफिकीर - उपसर्गघटित शब्द

बेपर्वा - उपसर्गघटित शब्द

बिनचूक - उपसर्गघटित शब्द

बिनतक्रार - उपसर्गघटित शब्द

बिनहरकत - उपसर्गघटित शब्द

नाराज - उपसर्गघटित शब्द

नापसंत - उपसर्गघटित शब्द


प्रत्ययघटित शब्द

खुदाई - प्रत्ययघटित शब्द

लढाई - प्रत्ययघटित शब्द

लढाई - प्रत्ययघटित शब्द

टिकाऊ - प्रत्ययघटित शब्द

लढाऊ - प्रत्ययघटित शब्द

झोपाळू - प्रत्ययघटित शब्द

लाजाळू - प्रत्ययघटित शब्द

दयाळू - प्रत्ययघटित शब्द

दुकानदार - प्रत्ययघटित शब्द

जमीनदार - प्रत्ययघटित शब्द

गुलामगिरी - प्रत्ययघटित शब्द

कामगिरी - प्रत्ययघटित शब्द

मानसिक - प्रत्ययघटित शब्द

सामाजिक - प्रत्ययघटित शब्द

आर्थिक - प्रत्ययघटित शब्द

लौकिक - प्रत्ययघटित शब्द 

आनंदित - प्रत्ययघटित शब्द

प्रेरित - प्रत्ययघटित शब्द 

जडत्व - प्रत्ययघटित शब्द 

गुरुत्व - प्रत्ययघटित शब्द 

तत्त्व - प्रत्ययघटित शब्द


अभ्यस्त

लाललाल - अभ्यस्त

हळूहळू - अभ्यस्त

तुकडेतुकडे - अभ्यस्त

धंदाबिंदा - अभ्यस्त  

कामबिंग - अभ्यस्त 

घरोघरी - अभ्यस्त 

कडकड - अभ्यस्त 

झटपट - अभ्यस्त 

खटपट - अभ्यस्त 

मागोमाग - अभ्यस्त 

वटवट - अभ्यस्त 

गल्लोगल्ली - अभ्यस्त


समानार्थी शब्द

 वृक्ष - झाड तरु

 आकाश -गगन

 मित्र - सखा सोबती

 वारा - वायू

 काया - शरीर देह

 मार्ग - वाट रस्ता

 हर्ष - आनंद

 कीर्ती - प्रसिद्धी

 मती - बुद्धि 

नदी - सरिता 

पृथ्वी - अवनी 

कान - कर्ण 

फुल - पुष्प

आवेश - आवेग 

होड - आवड  

आर्जव - विनंती आग्रह 

बडगा - दांडा दंड लाकूड 

वेळ - काळ 

रात्र - निशा 

माणूस - मनुष्य 

मुख - तोंड 

गोड - मधुर 

पान - पण 

झरा- निर्झर 

आयुष्य - जीवन


विरुद्धार्थी शब्द 

निरर्थक x अर्थपूर्ण 

गुण x अवगुण, दोष 

अवरोह x आरोह

बिकट x सरला

दुमत x एकमत 

ज्ञानी x अज्ञानी 

सुबोध x दुर्बोध 

अल्पायुषी x दीर्घायुषी 

सूर्योदय x सूर्यास्त 

आधुनिक x प्राचीन 

मालक x नोकर 

कमाल x किमान 

तिमिर x प्रकाश, तेज 

स्मरण x विस्मरण 

दुष्कर्म x सत्कर्म, पुण्य 

संक्षिप्त x विस्तीर्ण 

सुपीक x नापीक 

कृपा x अवकृपा 

ऊन x सावली 

सजातीय x विजातीय


शब्दसमूहासाठी एक शब्द

 ज्याला मरण नाही असा - अमर

 केलेले उपकार जाणणारा - कृतज्ञ

 समाजाची सेवा करणारा - समाजसेवक

 कुठलीही अपेक्षा न ठेवता - अनपेक्षित 

संपादन करणारा - संपादक 

ज्याचे आकलन होत नाही असे -अनाकलनीय 

महिन्यातून एकदा प्रकाशित होणारे - मासिक 

लिहिता वाचता न येणारा - निरक्षर 

पसरवलेली खोटी बातमी - अफवा 

दुसऱ्यावर अवलंबून असलेला - परावलंबी 

अपेक्षा नसताना - अनपेक्षित 

आठवड्यातून एकदा प्रसिद्ध होणारे - साप्ताहिक 

कोणाचाही आधार नसलेला - निराधार 

ज्याला कोणताही शत्रू नाही असा तो - अजातशत्रू 

केलेले उपकार न जाणणारा - कृतघ्न



वाक्प्रचार

१. कटाक्ष असणे-  खास लक्ष देणे 

आई वडील नेहमी मुलांच्या बाबतीत कटाक्ष असतात. 


२. कानोसा घेणे - अंदाज लावणे 

आभाळ आले की आपण पाऊस पडणार असा कानोसा घेतो.


३. हुकूमत गाजवने - अधिकार गाजवणे   

स्वतःच्या वस्तूवर आपण आपले हुकूमत गाजवतो.

 

४. कुचेष्टा करणे - टिंगल करणे  

वडील माणसांची कुचेष्टा करणे योग्य नाही.


५. रुंजी घालणे -भोवती चक्कर मारणे

मधमाशा फुलातील मध गोळा करण्यासाठी फुलां भोवती रुंजी घालतात.


६. पेव फुटणे - एखाद्या गोष्टीची संख्या वाढणे 

झाडावर चिमण्यांचा पेव फुटला.  


७. व्यथित होणे - दुःखी होणे 

शेजारचा रमेश हा नेहमी खेळत हसत राहणारा पण अचानक तो बिमार पडल्यामुळे सर्वजण व्यथित झाले. 


८. गुडघे टेकणे - हार मारणे, शरण जाणे 

कोविड-१९ समोर आपल्याला गुडघे टेकायचे नाहीत.


९. खनपटीला बसणे - सारखे विचारात राहणे 

सीमाला घरीयायला उशीर झाल्यावर आई खनपटीला बसली.


१०. तगादा लावणे - पिच्छा पुरवणे मागे लागणे 

वाढदिवसाला मला सायकल मिळावी म्हणून मी वडिलांकडे तगडा लावला.


११. कान देऊन ऐकणे - लक्षपूर्वक ऐकणे 

संस्कृतचे सर शिकवताना आम्ही कान देऊन ऐकतो.


१२. निकाल लावणे - संपवणे 

तिघांसाठी केलेल्या पोह्यांचा उन्नातीने एकटीनेच निकाल लावला.


१३. पिच्छा पुरवणे -  पाठलाग करणे

पोलिसांनी चोरीकारून पाळणाऱ्या चोराचा पिच्छा पुरवला.


१४. डोळे विस्फारून बघणे - आश्चर्याने बघणे 

संकेतला परीक्षेत पूर्ण गुण मिळाले आणि सर्वजण डोळे विस्फारून पाहत राहिले.


१५. लळा लावणे - खूप प्रेम करणे 

आई मुलांना लळा लावते.


१६. तुटून पडणे - गर्दी जमा होणे.

५०% दारात मिळणाऱ्या साड्यांच्या सेलवर महिला तुटून पडल्या.


१६. आनंद गगनात न मावणे - खूप आनंद होणे 

वर्गातील ४० विद्यार्थ्यांनी मराठीत १०० गुण मिळवले आणि शिक्षकांचा आनंद गगनात मावेनासा झाला.


१७. खस्ता खाने - खूप कष्ट करणे 

आई वडिलांनी मला शिकवण्यासाठी खूप खस्ता खाल्ल्या.


१८. कसब दाखवणे - कौशल्य दाखवणे 

विराट कोहली ने खेळत आपले कसब दाखवले.


१९. कंठस्नान घालने - ठार मारणे 

छ. शिवाजी महाराजांनी अफजल खानाला कंठस्नान घातले.


२०. प्रतीक्षा करणे - वाट पाहणे 

कोविड-१९ वर १००% प्रभावी लसीची आजही जनता प्रतीक्षा करत आहे.


२१. समरस होणे - एकरूप होणे 

शिरवाडकर यांच्या कविता वाचताना आजही मन समरस होते.


२२. कास धरणे - अनुसरण करणे 

आदर्श जीवन जगण्यासाठी रामायणाची कास धरणे आवश्यक वाटते.


२३. ताकास तूर लागू न देणे - गुपित पाळणे 

निर्मलला अभ्यासा विषयी विचारले असता, तो ताकास तूर लागु देत नाही.


२४. इनाम मिळणे - बक्षीस मिळणे 

संस्कृत श्लोक पाठ केल्याने शिक्षकांनी मला इनाम दिला.


२५. मान देणे - आदर करणे , सन्मान करणे 

शिक्षकांना मान देणे विद्यार्थ्यांचे कर्तव्यच आहे. 


२६. कित्ता गिरवणे - सराव करणे 

परीक्षा जवळ आली की विद्यार्थ्यांना लेखनाचा कित्ता गिरवावा लागतो.


२७. धीर न सुटणे - हिम्मत न करणे 

कोविड -१९ च्या या लढाईमध्ये आपल्याला धीर सोडायचा नाही.


२८. हृदयाला साद घालणे- मनापर्यंत पोचणे/पोहोचणे

मराठीच्या सरांनी शिकवलेली कविता विद्यार्थ्यांच्या हृदयाला साद घालते.


२९. पाठ फिरवणे - मदत न करणे 

पुन्हा पुन्हा भारतावर अतिरेकी हल्ला करणाऱ्या पाकिस्तानने भारतीय लस मागितली तर पाठ फिरवायला हरकत काय?


३०. विहार करणे - संचार करणे 

शाळा सुटली की, आम्ही मनसोक्त नदीच्या काठाने मुक्तपणे विहार करत असू.


३१. अचंबित होणे - चकित होणे 

नेहमी शांत राहणाऱ्या निशांत ने उत्कृष्ट भाषण देऊन सर्वांना अचंबित केले.


३२. तुळशीपत्र ठेवणे - त्याग करणे 

कोविड -१९ च्या या काळात डॉक्टर्स , सफाई कामगार आणि पोलिसांनी जणू आपल्या जीवनावर तुळशीपत्रच ठेवले आहे.


३४. तोंडसुख घेणे - टोचून बोलून आनंद घेणे, खूप बडबडणे 

शेजारच्या काकूंना तोंडसुख घ्यायला खूप आवडते.


३५. सार्थक होणे - धन्यता वाटणे 

मुलीला जिल्हाधिकारी झालेले पाहून , लक्ष्मीच्या जीवनाचे जणू सार्थक झाले.


३६. हातात हात असणे - सहकार्य करणे 

मित्रांचा हातात हात असताना संकटांना घाबरण्याचे काही कारण नसते.


३७. गगनभरारी घेणे - खूप प्रगती करणे 

रिक्षा चालवणाऱ्या बबनला आपल्या मुलाने गगनभरारी घ्यावी अशी तीव्र इच्छा होती.


३८. आकाशी झेप घेणे - मन ध्येयाकडे उंचावणे 

आकाशी झेप घेणे ही सर्वांची इच्छा असते.


३९. शिरोधार्य मानणे - आदरपूर्वक स्वीकार करणे 

मोठ्यांचा आशीर्वाद नेहमी शिरोधार्य मानवा.


४०. कडूस पडणे - अंधार पडणे 

सूर्य मावळतीला गेला की कडूस पडण्यास सुरुवात होते.


४१. निकराने लढणे - सर्व ताकतीने लढणे 

कोविड-१९ ला हरवायचे असल्यास आपल्या सर्वांना निकराने लढणे आवश्यकच आहे.


४२. मुग्ध होणे - तल्लीन होणे 

हल्ली सर्वच जण मोबाईलमध्ये मुग्ध झालेले दिसतात.


४३. मुहूर्तमेढ रोवणे - पाया घालने 

ऐकले आहे की, जपानने सर्वात आधी 5G च्या चाचणीची मुहूर्तमेढ रोवली आहे.


४४. रणशिंग फुंकणे - सुरुवात करणे 

पूर्वी युद्धाला रणशिंग फुंकण्यासाठी तोफेच्या आवाजाची मदत घेत असत.


४५. क्षीण होणे - नष्ट होत जाणे 

मोबाईल टावरमुळे पक्ष्यांच्या अनेक प्रजाती क्षीण होत आहेत.


४६. निष्कासित होणे - हाकलवून लावणे 

एखाद्या कडून निष्कासित होणे ही अपमानास्पद गोष्ट असते.


४७. पारख करणे - निरीक्षण करणे 

नेहमी नीट पारख करूनच वस्तू खरेदी करावी.


४८. पित्त खवळणे - खूप राग येणे.

पाकिस्तान पुन्हा पुन्हा भारतावर हल्ले करतो हे पाहून सैनिकांचे पित्त खवळते.


४९. हुकुमत गाजवणे - हक्क गाजवणे.

मुलगी वडिलांवर हुकुमत गाजवते.


५०. कानोसा घेणे - अंदाज घेणे.

वडिल सहलीला पाठवतील की नाही? याचा कानोसा घेण्यास मी आईला सांगितले.


५१. कुचेष्टा करणे - टिंगल करणे.

वरिष्ठांची कुचेष्टा करणे योग्य नाही.


५२. तावडीत सापडणे - कचाट्यात सापडणे.

खूप शोध केल्यावर चोर पोलिसांच्या कचाट्यात सापडलाच.


५३. काडीचाही त्रास नसणे - थोडासाही त्रास नसणे.

आई वडिलांना आज्ञाधारी मुलांचा काडीचाही त्रास नसतो.


५४. वीरगती प्राप्त होणे - शत्रूंशी लढताना मरण येणे.

युद्धात भारतीय सैनिकांना वीरगती प्राप्त झाली आहे.


५५. खूणगाठ बांधणे - दृढ निश्चय करणे.

आपण कोविड-१९ रूपी शत्रूला नष्ट करायचेच अशी खुणगाठ भारतीयांनी बांधावी व नेहमी मास्क वापरावा.


५६. सटकी मारणे - हळूच निघून जाने.

महेशने नाटकाचा सराव न झाल्याने सभागृहातून सटकी मारली.

11 comments: