‘माध्यमभाषया उत्तरम्’ ह्या प्रश्नाला सामोरे
जाताना...
बदललेल्या कृतिपत्रिकेचा विचार करता हा एक असा प्रश्न
आहे जो आपल्याला स्वतःच्या भाषेत म्हणजे माध्यमभाषेत लिहिता येतो अन्यथा बाकी सर्व
प्रश्नांची उत्तरे आपल्याला संस्कृत मधूनच लिहायची आहेत.(अनुवाद वगळता.)
‘माध्यमभाषया
उत्तरं लिखत|’ तसा अवघड प्रश्न
नाही तरीही काही विद्यार्थ्यांमध्ये याविषयी संभ्रम आहेत...
जसे,
१. उत्तर किती लिहायचे?
२. परिच्छेद किती करायचे?
३. प्रस्तावना लिहायची का? किती?
४. मार्गदर्शकाची(guide) भाषा/रचना चालते का?
आणि असेच अजूनही काही प्रश्न असतील.... तशाच प्रश्नांची उत्तर आपण या पोस्ट
मध्ये मिळवणार आहोत...
नमस्कार मित्रांनो, ‘लक्ष्यवेध संस्कृत अकॅडमी’च्या
या ब्लॉगवर तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे.
‘माध्यमभाषया
उत्तरम्’ ह्या प्रश्नाला सामोरे जाताना कोणकोणत्या बाबींचा विचार करायला
पाहिजे तेच आपण या पोस्ट च्या माध्यमातून समजून घेणार आहोत.
चलातर मग... पण पुढे जाण्या आधी एक विनंती, कृपया
आमच्या या ब्लॉगला Follow करा....
१. प्रश्न नीट समजला का?
माध्यमभाषया चे
उत्तर लिहिताना सर्वप्रथम तुम्हाला तो प्रश्न नीट समजला का? हे पहा, सहसा प्रश्न
अवघड नसतात पण एखाद वेळी प्रश्न फिरवून विचारला तर मग गोंधळ उडतो. म्हणून सर्व
प्रथम प्रश्न नीट समजून घ्या.
२. उत्तराची रचना?
नवीन कृतिपत्रिकेनुसार
‘माध्यमभाषया’ चे उत्तर लिहिताना त्या उत्तरला तुम्हाला,
वर्ग ९ वी - २ परिच्छेदात लिहायचे आहे.
(मुख्य उत्तर + सारांश= ‘माध्यामभाषया’चे उत्तर.)
वर्ग १० वी - ३ परिच्छेदात लिहायचे आहे.
(प्रस्तावना + मुख्य उत्तर + सारांश=‘माध्यामभाषया’चे उत्तर.)
३. प्रस्तावना किती आणि कशी?
प्रस्तावना फार काही अवघड नसते.
पाठाच्या सुरुवातीला पाठाविषयी जी माहिती तुम्हाला दिलेली असते, तीच असते त्या
पाठची प्रस्तावना. प्रस्तावनेत तो पाठ कुठून घेण्यात आला, त्यापाठाचा स्रोत कोणता,
लेखक, ग्रंथ, पाठची मूलसंकल्पना, पात्रांविषयी माहिती, कथेचे महत्त्व इत्यादी...
इत्यादी.. माहिती असते. आता प्रश्न उरतो प्रस्तावना किती लिहायची? तुम्हाला
प्रस्तावना २-३ वाक्यात लिहायची आहे बस्स.. यापेक्षा जास्त प्रस्तावना अपेक्षित
नाही, प्रस्तावना मोठी लिहिली तर चालेते पण अनिवार्य नाही.
४. मुख्य उत्तर किती आणि कसे लिहायचे?
प्रस्तावाने नंतर असते मुख्य उत्तर, या परिच्छेदात
तुम्हाला विचारलेल्या प्रश्नाचे ६ ओळींपर्यंत उत्तर लिहायचे आहे. थोडक्यात काय तर विचारलेल्या
प्रश्नाचे समाधान तुमच्या उत्तरात झाले पाहिजे. उत्तरात प्रश्नाला समर्पक
वाक्यरचना, काळ, सर्वनाम आणि विरामचिन्हांचा उपयोग करावा.
५. सारांश ... म्हणजे?
हा तिसरा आणि
महत्त्वाचा परिच्छेद , या परिच्छेदात तुम्हाला प्रस्तावना + मुख्य उत्तर यांचा
थोडक्यात म्हणजे २/३ वाक्यात सारांश सांगायचा आहे. जसे पाठातील ही महत्त्वाची घटना,
पाठात सांगितलेला उपदेश, संदेश, ज्ञान किंवा जे काही पाठाच्या माध्यमातून तुम्हाला कळाले आहे ते, तुम्हाला
कमीत कमी शब्दात येथे मांडायचे आहे.
६. मार्गदर्शकातील उत्तर चालते का?
मार्गदर्शक म्हणजे मार्ग दाखविणारा, पण त्यामार्गावर तुम्हालाच चालायचे आहे. आम्ही बऱ्याच (वर्ग १० वी च्या ) मार्गदर्शकात
असे पहिले कि, त्यात माध्यमभाषया ची प्रस्तावना दिलेली नाही, उत्तर अतिशय
दीर्घ , परिच्छेद पडले नाहीत, अश्यावेळी जे विद्यार्थी केवळ मार्गदर्शकांवर
अवलंबून राहतात त्यांचे नुकसान होते. पण उत्तर काय आहे हे समजण्यासाठी मार्गदर्शके
उपयोगी ठरतात.(आम्ही मार्गदर्शकांचा विरोध किंवा समर्थन करत नाही.)
७. गुणविभागणी-
काही विद्यार्थी विचारतात सर प्रस्तावना
नाही लिहीलीतर मार्क्स कटतात का? सारांश नाही लिहिलातर मार्क्स कटतात का? तर
याचे उत्तर आहे हो..
वर्ग ९ वी, पहिल्या परिच्छेदाला(मुख्य उत्तरला) १ गुण आणि दुसऱ्या परिच्छेदाला(सारांशला.)
१ गुण. असे २ गुण.
वर्ग १० वी. प्रस्तावना अर्धा गुण , मुख्य उत्तर १ गुण आणि अर्धा गुण सारांश
ला. असे टोटल २ गुण.
जर आपण ठराविक आराखड्यात उत्तर लिहिले तर आपल्याला पूर्ण गुण नक्कीच मिळतात. म्हणून तुम्ही छान उत्तर लिहा, छान गुण मिळावा.
वरील माहिती तुम्ही एक-दोन वेळा नीट वाचून घ्या.... या
पोस्ट मध्ये विद्यार्थ्यंकडून येणाऱ्या प्रश्नांचे जास्तीतजास्त समाधान करण्याचा
प्रयत्न आम्ही केल आहे. याहूनही तुमचे प्रश्न काही वेगळे असतील तर ते आम्हाला कळवा
त्याही प्रश्नांचे उत्तर देण्याचा आम्ही प्रयत्न करू.
आशा आहे तुम्हाला ह्या पोस्टमधील माहिती कळाली असेल, आणि जर तुम्हाला ही
माहिती कळली आणि आवडली असेल, तर कृपया
खाली Comments box मध्ये तुमचे प्रोत्साहन कळवा, तुम्हाला पुढील पोस्ट कोणत्या
बाबतीत वाचायला आवडेल तेही सांगा, आणि हो.... Please Follow Our Blog.
चला, भेटू मग पुढील पोस्ट मध्ये...
धन्यवाद!!!
कृपया आपल्या सूचना /कल्पना Comments मध्ये कळवा.