Friday, July 17, 2020

मी सुखदेव कि कुरबान हुसेन? - राज्य मंडळाच्या मराठीच्या पुस्तकातील घोडचूक.

नमस्कार मित्रांनो...., क्षमा करा, पण आज तुमचे स्वागत करण्याचीही मानसिकता आमच्यात नाही.
     काय झालं ...?  जे झालं ते राज्यमंडळाच्या किंवा शिक्षकाच्या गरिमेला शोभणारं नाही...आज सकाळी सकाळी बातम्या पाहण्यासाठी TV सुरु केला आणि... एका मराठी NEWS Channel वर चर्चा सुरु होती... की, राज्यमंडळाच्या ८वी च्या मराठीच्या पुस्तकातील एक चूक(?)...
     भगतसिंघ , राजगुरू आणि कुरबान हुसेन हे देशभक्त फासावर गेले.... काय!!कुर्बान हुसेन? अहो तिथे सुखदेव आहे ना? होय हीच ती चूक.(?)
     TV वरील चर्चे वरून आम्ही ते तपासले आणि थक्क झालो, राज्यमंडळाच्या ८वी च्या मराठीच्या पुस्तकातील दुसऱ्यापाठात ही चूक(?) आढळली आहे.
     माझे माझ्या देशावर प्रेम आहे. या नावाचा पाठ यदुनाथ थत्ते(१९२२-१९९८) यांच्या प्रतिज्ञा- पाठ्यपुस्तकातील  या पुस्तकातून घेतला आहे. यदुनाथ थत्ते एक लेखक , संपादक , बालसाहित्यकार, चित्रकार होते. त्यांचे पुष्कळ लेखन प्रसिद्ध आहे.
     प्रस्तुत माझे माझ्या देशावर प्रेम आहे या पाठात त्यांनी पं. नेहरू, म. गांधी. संत कबीर, साने गुरुजी यांच्या संदर्भाने देशावर प्रेम करणे म्हणजे काय ? आणि नेमके, प्रेम म्हणजे काय? हे स्पष्ट केले आहे. पाठातील पहिल्याच पानावर एका विद्यार्थ्याच्या तोंडून "भगतसिंग, राजगुरु आणि कुरबान हुसेन हे फासावर गेले. ते देशावर खरेखुरे प्रेम करत होते." असे वाक्य आले आहे. खरेतर  भगतसिंग राजगुरू नंतर येणार नाव आपल्या सर्वांनाच बरोबर माहित आहे तरीही येथे कुरबान हुसेन असे नाव का आले? कोणाची निष्काळजी? चूक? गुन्हा!?? का आणखी काही तथ्य आहेत ....?
     यदुनाथ थत्ते सारख्या अनेक पैलू असलेल्या लेखकाच्या लेखणीतून अशी चूक होणे शक्य वाटत नाही. मग चूक कुठे आणि कशी झाली?
     जवळ जवळ ४० शिक्षकांच्या समूहाने हे पुस्तक तयार केले आहे. यातील सर्वच शिक्षक तज्ज्ञ आहेत, उच्च पदस्थ आहेत, ज्येष्ठ आहेत, तरीही अशी चूक कशी झाली ?

चुकीस जबाबदार कोण कोण?
महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळातील
१. मराठी भाषा अभ्यास गट
२. समन्वयक
३. तज्ज्ञ समिती इत्यादी.( इत्यादी म्हणजे ज्यांचा पुस्तकाच्या निर्मितीत संबंध आहे असे सर्वच)
४. २०१८ ला पुस्तक प्रकाशित झाले आणि अद्याप हा विषय शिकवणाऱ्या कोणत्याही शिक्षकाने या वर आक्षेप घेतला नाही असे शिक्षक.
५. मार्गदर्शक(Guide) निर्माते.
६. हा विषय क्लास्सेस मध्ये शिकवत असल्यास, क्लास्सेस मधील 'ते शिक्षक'.
 वरील सर्व हे, असे लोक आहेत ज्यांना हि चूक २०१८ पासून २०२० पर्यंत च्या काळात लक्षात आली नाही.

या सर्व गोंधळातून निर्माण होणारे प्रश्न -
१. वरील पैकी कोणीही २०१८ पासून या पुस्तकाला व्यवस्थित वाचलेच नाही का?
२. कोणी जाणीवपूर्वक तर केले नाही ना?
३. यातून राजकारण्यांना हिंदू मुस्लीम करण्याचा मुद्दा तर मिळाला नाही ना?
४. बालमनावर काय परिणाम होईल?
५. पालकवर्ग या पश्चात अभ्यासमंडळ, शिक्षक, क्लासेस आणि मार्गदर्शके यांच्यावर विश्वास ठेऊ शकतील का?त्यांनी विश्वास ठेवावा का?आणि का ठेवावा?
६. ज्यांचा दोष आहे त्यांना दंड मिळेल?
७. न्यायालयात गुन्हा नोंदवला जाईल ?
८. या सर्व गोंधळाचे उत्तर कोण देणार?
९. या नंतर असा गोंधळ होणार नाही याची खबरदारी म्हणून कोणती कोणत्या उपाययोजना केल्या जातील?

असे आणि असेच अजूनही प्रश्न येथे उपस्थित होतात....

हे सर्वच तथ्य आहेत आणि वरील मुद्द्यांना खोटे ठरवता येत नाही.

असो.... आमच्या या विवेचनातून कोणाला वाईट वाटल्यास, किंवा दुःख झाल्यास क्षमा करावी आमचा कोणालाही दुखावण्याचा हेतू नाही.

1 comment:

  1. मला मुळी ही चूक वाटतच नाही. त्याची कारणे-
    १.हा पाठ प्रतिज्ञेतील राष्ट्रभक्ती,बंधुता या मूल्यांना रुजविण्यासाठी आहे.
    २.राष्ट्र हे मानवी समाजांनी बनते. राष्ट्र म्हणजे राष्ट्रातील लोक. ते विविध धर्मांचे आहेत.
    ३.लेखक यदुनाथ थत्ते यांनी या धर्मकल्पनेच्या पार जाऊन राष्ट्रासाठी आत्मबलिदान केलेल्या एका प्रातिनिधिक नावाचा -कुर्बान हुसेन -उल्लेख सयुक्तिक असा वाटतो.
    ४.आक्षेप घेण्यासाठी आपल्या दृष्टीने त्यात काय वावगे आहे, समजत नाही.
    ५.इयत्ता सातवीच्या याआधीच्या पाठ्यपुस्तकात असलेल्या एका कवितेत कवीने म्हटले होते -
    'टिळक, गोखले, फुले, रानडे, आगरकर वैखरी
    स्वातंत्र्याच्या पाच मशाली जळती वेदीवरी'
    आता आपल्या म्हणण्याप्रमाणे कुणाच्या नावानंतर कुणाचे नाव आल्यावर बरोबर ठरणार? उदा.म.फुले म्हटले की राजर्षी शाहू महाराजांचे नाव ओघाने येते. मग नंतर डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे नाव येते. असा नावनावांंचा क्रम कवितेत नाही म्हणून आक्षेप घ्यायचा?
    मी इ.आठवीला मराठी विषय शिकवतो.भारतीय संविधान मूल्ये समजावून घेण्यास विद्यार्थ्यांना मदत करतो!
    - महादेव भोकरे,वडूज.9921515594

    ReplyDelete