Friday, October 16, 2020

आमोदः/आनन्दः वर्ग ८वी च्या सर्व धातूंचे मराठीत अर्थ pdf स्वरूपात

 नमस्कार मित्रांनो, 

        लक्ष्यवेध संस्कृत अकॅडमी च्या या ब्लॉग वर तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आम्ही तुमच्या साठी घेऊन आलो आहोत -

वर्ग ८वी च्या सर्व धातूंचे मराठीत अर्थ pdf स्वरूपात . खालील निळ्या Link ला Click करा.

.

.











-->>> वर्ग ८ वी सर्व धातूंचे मराठी अर्थ <<<---

.

.

.

आशा करतो तुम्हाला PDF मिळाली असेल,  मिळाली असेल तर कृपया आमच्या या ब्लॉग ला Follow करा आणि हो Comments मध्ये आम्हाला तुमच्या सूचना/ कल्पना कळवायला विसरू नका.



भेटू पुढील पोस्ट मध्ये ,
धन्यवाद!!!

Monday, October 5, 2020

'सूक्तिसुधा' या पाठाची ३० गुणांची दर्जेदार कृतिपत्रिका PDF स्वरूपात

 नमस्कार मित्रांनो, 

        लक्ष्यवेध संस्कृत अकॅडमी च्या या ब्लॉग वर तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आम्ही तुमच्या साठी घेऊन आलो आहोत - 


     वर्ग १० वी च्या संस्कृतचा तीसरा म्हणजे 'सूक्तिसुधाया पाठाची ३० गुणांची दर्जेदार व बोर्ड परीक्षेच्या आराखड्याप्रमाणे तयार केलीली प्रश्नपत्रिका (कृतिपत्रिका)

.
.  
खालील पाठाच्या नावावर क्लिक करा व कृतिपत्रिका मिळवा.


'सूक्तिसुधा'







आशा करतो तुम्हाला कृतिपत्रिका (PDF स्वरूपात) मिळाली असेल मिळाली असेल तर कृपया आमच्या या ब्लॉग ला Follow करा आणि हो Comments मध्ये आम्हाला तुमच्या सूचना/ कल्पना कळवायला विसरू नका.



भेटू पुढील पोस्ट मध्ये ,
धन्यवाद!!!

Sunday, August 9, 2020

नवमी कक्षा । प्रथमः पाठः। सुष्ठु गृहीतः चौर:। २० गुणांची दर्जेदार कृतिपत्रिका

   नवमी कक्षा । प्रथमः पाठः। सुष्ठु गृहीतः चौर:। २० गुणांची दर्जेदार कृतिपत्रिका

कृतिपत्रिका आवडल्यास कृपया पेजला फॉलो करा आणि Comments मध्ये सांगा तुम्हाला ही परीक्षा कशी वाटली


Monday, August 3, 2020

'व्यसने मित्रपरीक्षा|' या पाठाची ३० गुणांची दर्जेदार कृतिपत्रिका PDF स्वरूपात

नमस्कार मित्रांनो, लक्ष्यवेध संस्कृत अकॅडमी च्या या ब्लॉग वर तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आम्ही तुमच्या साठी घेऊन आलो आहोत - वर्ग १० वी च्या संस्कृतचा दुसरा म्हणजे 'व्यसने मित्रपरीक्षा|या पाठाची ३० गुणांची दर्जेदार व बोर्ड परीक्षेच्या आराखड्याप्रमाणे तयार केलीली प्रश्नपत्रिका (कृतिपत्रिका)
.
.  
खालील पाठाच्या नावावर क्लिक करा व कृतिपत्रिका मिळवा.

'व्यसने मित्रपरीक्षा |'



आशा करतो तुम्हाला कृतिपत्रिका (PDF स्वरूपात) मिळाली असेल मिळाली असेल तर कृपया आमच्या या ब्लॉग ला Follow करा आणि हो Comments आम्हाला तुमच्या सूचना/ कल्पना कळवायला विसरू नका.



भेटू पुढील पोस्ट मध्ये ,
धन्यवाद!!!

Saturday, July 25, 2020

व्यसने मित्रपरीक्षा| या पाठाचे माध्यमभाषया उत्तरं लिखत|

||लक्ष्यवेध संस्कृत अकॅडेमी||
तर्फे सर्व विद्यार्थ्यांसाठी व्यसने मित्रपरीक्षा| या पाठाचे माध्यमभाषया उत्तरं लिखत| चे उत्तर.(मराठी माध्यमासाठी)

प्र. १.  ‘स नरः शत्रुनन्दनः’  इति वचनं कथायाः आधारेण स्पष्टीकुरुत|
प्र. . काकेन कः उपायः उक्तः ?



प्रस्तुत उत्तर मराठी माध्यमासाठी उपयुक्त आहे.
अशाच उपयोगी पोस्ट वाचण्यासाठी आमच्या या ब्लॉग ला Follow करा आणि हो... इतरांशी हि माहिती Share करायला विसरू नका, तुम्हाला हा पोस्ट / माहिती कशी वाटली तेही आम्हाला Comments मध्ये नक्की कळवा.

भेटू मग पुढील पोस्ट मध्ये 
धन्यवाद!!!

Friday, July 17, 2020

मी सुखदेव कि कुरबान हुसेन? - राज्य मंडळाच्या मराठीच्या पुस्तकातील घोडचूक.

नमस्कार मित्रांनो...., क्षमा करा, पण आज तुमचे स्वागत करण्याचीही मानसिकता आमच्यात नाही.
     काय झालं ...?  जे झालं ते राज्यमंडळाच्या किंवा शिक्षकाच्या गरिमेला शोभणारं नाही...आज सकाळी सकाळी बातम्या पाहण्यासाठी TV सुरु केला आणि... एका मराठी NEWS Channel वर चर्चा सुरु होती... की, राज्यमंडळाच्या ८वी च्या मराठीच्या पुस्तकातील एक चूक(?)...
     भगतसिंघ , राजगुरू आणि कुरबान हुसेन हे देशभक्त फासावर गेले.... काय!!कुर्बान हुसेन? अहो तिथे सुखदेव आहे ना? होय हीच ती चूक.(?)
     TV वरील चर्चे वरून आम्ही ते तपासले आणि थक्क झालो, राज्यमंडळाच्या ८वी च्या मराठीच्या पुस्तकातील दुसऱ्यापाठात ही चूक(?) आढळली आहे.
     माझे माझ्या देशावर प्रेम आहे. या नावाचा पाठ यदुनाथ थत्ते(१९२२-१९९८) यांच्या प्रतिज्ञा- पाठ्यपुस्तकातील  या पुस्तकातून घेतला आहे. यदुनाथ थत्ते एक लेखक , संपादक , बालसाहित्यकार, चित्रकार होते. त्यांचे पुष्कळ लेखन प्रसिद्ध आहे.
     प्रस्तुत माझे माझ्या देशावर प्रेम आहे या पाठात त्यांनी पं. नेहरू, म. गांधी. संत कबीर, साने गुरुजी यांच्या संदर्भाने देशावर प्रेम करणे म्हणजे काय ? आणि नेमके, प्रेम म्हणजे काय? हे स्पष्ट केले आहे. पाठातील पहिल्याच पानावर एका विद्यार्थ्याच्या तोंडून "भगतसिंग, राजगुरु आणि कुरबान हुसेन हे फासावर गेले. ते देशावर खरेखुरे प्रेम करत होते." असे वाक्य आले आहे. खरेतर  भगतसिंग राजगुरू नंतर येणार नाव आपल्या सर्वांनाच बरोबर माहित आहे तरीही येथे कुरबान हुसेन असे नाव का आले? कोणाची निष्काळजी? चूक? गुन्हा!?? का आणखी काही तथ्य आहेत ....?
     यदुनाथ थत्ते सारख्या अनेक पैलू असलेल्या लेखकाच्या लेखणीतून अशी चूक होणे शक्य वाटत नाही. मग चूक कुठे आणि कशी झाली?
     जवळ जवळ ४० शिक्षकांच्या समूहाने हे पुस्तक तयार केले आहे. यातील सर्वच शिक्षक तज्ज्ञ आहेत, उच्च पदस्थ आहेत, ज्येष्ठ आहेत, तरीही अशी चूक कशी झाली ?

चुकीस जबाबदार कोण कोण?
महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळातील
१. मराठी भाषा अभ्यास गट
२. समन्वयक
३. तज्ज्ञ समिती इत्यादी.( इत्यादी म्हणजे ज्यांचा पुस्तकाच्या निर्मितीत संबंध आहे असे सर्वच)
४. २०१८ ला पुस्तक प्रकाशित झाले आणि अद्याप हा विषय शिकवणाऱ्या कोणत्याही शिक्षकाने या वर आक्षेप घेतला नाही असे शिक्षक.
५. मार्गदर्शक(Guide) निर्माते.
६. हा विषय क्लास्सेस मध्ये शिकवत असल्यास, क्लास्सेस मधील 'ते शिक्षक'.
 वरील सर्व हे, असे लोक आहेत ज्यांना हि चूक २०१८ पासून २०२० पर्यंत च्या काळात लक्षात आली नाही.

या सर्व गोंधळातून निर्माण होणारे प्रश्न -
१. वरील पैकी कोणीही २०१८ पासून या पुस्तकाला व्यवस्थित वाचलेच नाही का?
२. कोणी जाणीवपूर्वक तर केले नाही ना?
३. यातून राजकारण्यांना हिंदू मुस्लीम करण्याचा मुद्दा तर मिळाला नाही ना?
४. बालमनावर काय परिणाम होईल?
५. पालकवर्ग या पश्चात अभ्यासमंडळ, शिक्षक, क्लासेस आणि मार्गदर्शके यांच्यावर विश्वास ठेऊ शकतील का?त्यांनी विश्वास ठेवावा का?आणि का ठेवावा?
६. ज्यांचा दोष आहे त्यांना दंड मिळेल?
७. न्यायालयात गुन्हा नोंदवला जाईल ?
८. या सर्व गोंधळाचे उत्तर कोण देणार?
९. या नंतर असा गोंधळ होणार नाही याची खबरदारी म्हणून कोणती कोणत्या उपाययोजना केल्या जातील?

असे आणि असेच अजूनही प्रश्न येथे उपस्थित होतात....

हे सर्वच तथ्य आहेत आणि वरील मुद्द्यांना खोटे ठरवता येत नाही.

असो.... आमच्या या विवेचनातून कोणाला वाईट वाटल्यास, किंवा दुःख झाल्यास क्षमा करावी आमचा कोणालाही दुखावण्याचा हेतू नाही.

Thursday, July 16, 2020

'आद्यकृषकः पृथुवैन्यः |' या पाठाची ३० गुणांची दर्जेदार कृतिपत्रिका (PDF स्वरूपात) Download करा.

नमस्कार मित्रांनो, लक्ष्यवेध संस्कृत अकॅडमी च्या या ब्लॉग वर तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आम्ही तुमच्या साठी घेऊन आलो आहोत - वर्ग १० वी च्या संस्कृतचा पहिला म्हणजे 'आद्यकृषकः पृथुवैन्यः |' या पाठाची ३० गुणांची दर्जेदार व बोर्ड परीक्षेच्या आराखड्याप्रमाणे तयार केलीली प्रश्नपत्रिका (कृतिपत्रिका)
.
.
खालील पाठाच्या नावावर क्लिक करा व कृतिपत्रिका मिळवा.

'आद्यकृषकः पृथुवैन्यः |'



आशा करतो तुम्हाला कृतिपत्रिका (PDF स्वरूपात) मिळाली असेल मिळाली असेल तर कृपया आमच्या या ब्लॉग ला Follow करा आणि हो Comments आम्हाला तुमच्या सूचना/ कल्पना कळवायला विसरू नका.



भेटू पुढील पोस्ट मध्ये ,
धन्यवाद!!!

Wednesday, July 15, 2020

आद्यकृषकः पृथुवैन्यः पाठाचे माध्यमभाषयाचे उत्तर.

आद्यकृषकः पृथुवैन्यः पाठाचे माध्यमभाषयाचे उत्तर.
प्र. १. भूमाता पृथुवैन्यं किम् उपादिशत्?
 प्र.२. धरित्र्याः उपदेशं मनसि निधाय पृथुवैन्यः किं किम् अकरोत्?




















प्रस्तुत उत्तर मराठी माध्यमासाठी उपयुक्त आहे.
अशाच उपयोगी पोस्ट वाचण्यासाठी आमच्या या ब्लॉग ला Follow करा आणि हो... इतरांशी हि माहिती Share करायला विसरू नका, तुम्हाला हा पोस्ट / माहिती कशी वाटली तेही आम्हाला Comments मध्ये नक्की कळवा.

भेटू मग पुढील पोस्ट मध्ये 
धन्यवाद!!!


Saturday, July 11, 2020

‘माध्यमभाषया उत्तरम्’ ह्या प्रश्नाला सामोरे जाताना... वर्ग ९ वी व १० वीसाठी उपयोगी पोस्ट.


माध्यमभाषया उत्तरम्’ ह्या प्रश्नाला सामोरे जाताना...
बदललेल्या कृतिपत्रिकेचा विचार करता हा एक असा प्रश्न आहे जो आपल्याला स्वतःच्या भाषेत म्हणजे माध्यमभाषेत लिहिता येतो अन्यथा बाकी सर्व प्रश्नांची उत्तरे आपल्याला संस्कृत मधूनच लिहायची आहेत.(अनुवाद वगळता.)
 माध्यमभाषया उत्तरं लिखत|’ तसा अवघड प्रश्न नाही तरीही काही विद्यार्थ्यांमध्ये याविषयी संभ्रम आहेत...
जसे,
१. उत्तर किती लिहायचे?
२. परिच्छेद किती करायचे?
३. प्रस्तावना लिहायची का? किती?
४. मार्गदर्शकाची(guide) भाषा/रचना चालते का?
आणि असेच अजूनही काही प्रश्न असतील.... तशाच प्रश्नांची उत्तर आपण या पोस्ट मध्ये मिळवणार आहोत...
नमस्कार मित्रांनो, ‘लक्ष्यवेध संस्कृत अकॅडमी’च्या या ब्लॉगवर तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे.
माध्यमभाषया उत्तरम्’ ह्या प्रश्नाला सामोरे जाताना कोणकोणत्या बाबींचा विचार करायला पाहिजे तेच आपण या पोस्ट च्या माध्यमातून समजून घेणार आहोत.
चलातर मग... पण पुढे जाण्या आधी एक विनंती, कृपया आमच्या या ब्लॉगला Follow करा....

१. प्रश्न नीट समजला का?
    माध्यमभाषया चे उत्तर लिहिताना सर्वप्रथम तुम्हाला तो प्रश्न नीट समजला का? हे पहा, सहसा प्रश्न अवघड नसतात पण एखाद वेळी प्रश्न फिरवून विचारला तर मग गोंधळ उडतो. म्हणून सर्व प्रथम प्रश्न नीट समजून घ्या.

२. उत्तराची रचना?
    नवीन कृतिपत्रिकेनुसार ‘माध्यमभाषया’ चे उत्तर लिहिताना त्या उत्तरला तुम्हाला,
वर्ग ९ वी - २ परिच्छेदात लिहायचे आहे.
(मुख्य उत्तर + सारांश= ‘माध्यामभाषया’चे उत्तर.)
वर्ग १० वी - ३ परिच्छेदात लिहायचे आहे.
(प्रस्तावना + मुख्य उत्तर + सारांश=‘माध्यामभाषया’चे उत्तर.)

३. प्रस्तावना किती आणि कशी?
    प्रस्तावना फार काही अवघड नसते. पाठाच्या सुरुवातीला पाठाविषयी जी माहिती तुम्हाला दिलेली असते, तीच असते त्या पाठची प्रस्तावना. प्रस्तावनेत तो पाठ कुठून घेण्यात आला, त्यापाठाचा स्रोत कोणता, लेखक, ग्रंथ, पाठची मूलसंकल्पना, पात्रांविषयी माहिती, कथेचे महत्त्व इत्यादी... इत्यादी.. माहिती असते. आता प्रश्न उरतो प्रस्तावना किती लिहायची? तुम्हाला प्रस्तावना २-३ वाक्यात लिहायची आहे बस्स.. यापेक्षा जास्त प्रस्तावना अपेक्षित नाही, प्रस्तावना मोठी लिहिली तर चालेते पण अनिवार्य नाही.

४. मुख्य उत्तर किती आणि कसे लिहायचे?
प्रस्तावाने नंतर असते मुख्य उत्तर, या परिच्छेदात तुम्हाला विचारलेल्या प्रश्नाचे ६ ओळींपर्यंत उत्तर लिहायचे आहे. थोडक्यात काय तर विचारलेल्या प्रश्नाचे समाधान तुमच्या उत्तरात झाले पाहिजे. उत्तरात प्रश्नाला समर्पक वाक्यरचना, काळ, सर्वनाम आणि विरामचिन्हांचा उपयोग करावा.

५. सारांश ... म्हणजे?
    हा तिसरा आणि महत्त्वाचा परिच्छेद , या परिच्छेदात तुम्हाला प्रस्तावना + मुख्य उत्तर यांचा थोडक्यात म्हणजे २/३ वाक्यात सारांश सांगायचा आहे. जसे पाठातील ही महत्त्वाची घटना, पाठात सांगितलेला उपदेश, संदेश, ज्ञान किंवा जे काही पाठाच्या माध्यमातून तुम्हाला कळाले आहे ते, तुम्हाला कमीत कमी शब्दात येथे मांडायचे आहे.

६. मार्गदर्शकातील उत्तर चालते का?
     मार्गदर्शक म्हणजे मार्ग दाखविणारा, पण त्यामार्गावर तुम्हालाच चालायचे आहे. आम्ही बऱ्याच (वर्ग १० वी च्या ) मार्गदर्शकात असे पहिले कि, त्यात माध्यमभाषया ची प्रस्तावना दिलेली नाही, उत्तर अतिशय दीर्घ , परिच्छेद पडले नाहीत, अश्यावेळी जे विद्यार्थी केवळ मार्गदर्शकांवर अवलंबून राहतात त्यांचे नुकसान होते. पण उत्तर काय आहे हे समजण्यासाठी मार्गदर्शके उपयोगी ठरतात.(आम्ही मार्गदर्शकांचा विरोध किंवा समर्थन करत नाही.)


७. गुणविभागणी-
    काही विद्यार्थी विचारतात सर प्रस्तावना नाही लिहीलीतर मार्क्स कटतात का? सारांश नाही लिहिलातर मार्क्स कटतात का? तर याचे उत्तर आहे हो..
वर्ग ९ वी, पहिल्या परिच्छेदाला(मुख्य उत्तरला) १ गुण आणि दुसऱ्या परिच्छेदाला(सारांशला.) १ गुण. असे २ गुण.
वर्ग १० वी. प्रस्तावना अर्धा गुण , मुख्य उत्तर १ गुण आणि अर्धा गुण सारांश ला. असे टोटल २ गुण.

जर आपण ठराविक आराखड्यात उत्तर लिहिले तर आपल्याला पूर्ण गुण नक्कीच मिळतात. म्हणून तुम्ही छान उत्तर लिहा, छान गुण मिळावा.

वरील माहिती तुम्ही एक-दोन वेळा नीट वाचून घ्या.... या पोस्ट मध्ये विद्यार्थ्यंकडून येणाऱ्या प्रश्नांचे जास्तीतजास्त समाधान करण्याचा प्रयत्न आम्ही केल आहे. याहूनही तुमचे प्रश्न काही वेगळे असतील तर ते आम्हाला कळवा त्याही प्रश्नांचे उत्तर देण्याचा आम्ही प्रयत्न करू.


आशा आहे तुम्हाला ह्या पोस्टमधील माहिती कळाली असेल, आणि जर तुम्हाला ही माहिती कळली आणि आवडली असेल,  तर कृपया खाली Comments box मध्ये तुमचे प्रोत्साहन कळवा, तुम्हाला पुढील पोस्ट कोणत्या बाबतीत वाचायला आवडेल तेही सांगा, आणि हो.... Please Follow Our Blog.

चला, भेटू मग पुढील पोस्ट मध्ये...
धन्यवाद!!!
कृपया आपल्या सूचना /कल्पना Comments मध्ये कळवा.

Monday, July 6, 2020

#संस्कृत_निबन्धः #मम_प्रियः_खगः_मयूरः

#संस्कृत_निबन्धः #मम_प्रियः_खगः_मयूरः
#Sanskrit_essay
Essay on Mayur in sanskrit with marathi translation/Meaning
संस्कृत निबंध - मयूर - मराठी अर्थासह.
आमोद संपूर्ण १० वी  साठी उपयुक्त


अशाच उपयोगी पोस्ट वाचण्यासाठी कृपया आमच्या या ब्लॉग ला Follow करा
आणि हो...!!! अहो, Comments मध्ये सांग ना कशी वाटली हि पोस्ट?

Thursday, July 2, 2020

उपपदविभक्तिः – षष्ठी विभक्तिः। कक्षा–अष्टमी‚ नवमी‚ दशमी।



परीक्षा देण्यासाठी कृपया खालील निळ्या लिंकवर क्लिक करा..

उपपदविभक्तिः – षष्ठी विभक्तिः।  कक्षा–अष्टमी‚ नवमी‚ दशमी।

अश्याच परीक्षा पुन्हा देण्यासाठी कृपया आमच्या या पेज ला follow करा...

Wednesday, July 1, 2020

#संस्कृत_निबन्धः #मम_प्रिया_भाषा_संस्कृतभाषा

#संस्कृत_निबन्धः #मम_प्रिया_भाषा_संस्कृतभाषा
#Sanskrit_essay
Essay on SanskritLanguage in sanskrit with marathi translation/Meaning
संस्कृत निबंध - संस्कृत भाषा - मराठी अर्थासह.
आमोद संपूर्ण १० वी  साठी उपयुक्त










अश्याच उपयुक्त पोस्ट वाचण्यासाठी आमच्या या ब्लॉग ला Follow करा.
Commments मध्ये सांगा तुम्हाला ही पोस्ट कशी वाटली, आणि हो..... ही पोस्ट इतरांना share करायला विसरू नका....

Sunday, June 28, 2020

#संस्कृत_निबन्धः #मम_प्रियः_उत्सवः_दीपवलिः #Sanskrit_essay

#संस्कृत_निबन्धः #मम_प्रियः_उत्सवः_दीपवलिः
#Sanskrit_essay
Essay on diwali in sanskrit with marathi translation
संस्कृत निबंध - दीपावली - मराठी अर्थासह.
आमोद संपूर्ण १० वी  साठी उपयुक्त





अश्याच उपयोगी पोस्ट वाचण्यासाठी आमच्या या पेज ला  Follow  करा

Comments मध्ये सांगा तुम्हाला पुढील पोस्ट कोणत्या विषयावर पाहिजे...

भेटू पुढील पोस्ट मध्ये,
धन्यवाद...!!!



Saturday, June 27, 2020

अनुस्वार कुठे आणि म् (हलन्त) कुठे?

अनुस्वार कुठे आणि म् (हलन्त) कुठे?

     संस्कृतवाक्यरचना करताना शब्दाच्या शेवटच्या अक्षरावर अनुस्वाराचे उच्चारण आल्यास बऱ्याच विद्यार्थ्यांचा किंबहुना काही शिक्षकांचाही ‘येथे अनुस्वार द्यायचा की... हलन्त (म्) करायचे?’ असा गोंधळ उडालेला मी पाहिला आहे. त्याच दुविधेचे समाधान करण्याचा प्रयत्न येथे केला आहे....

    नमस्कार मित्रांनो,

लक्ष्यवेध संस्कृत अकॅडेमीच्या या ब्लॉग वर तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, आम्ही या ब्लॉगच्या माध्यमातून सामान्यातिसामान्य विद्यार्थ्याला संस्कृतव्याकरण , वाक्यरचना, इ. संबंधी जे प्रश्न पडतात त्यांचे समाधान करण्याचा प्रयत्न करत असतो... असाच एक प्रयत्न आज ही...

(कृपया, तज्ज्ञ शिक्षकांनी आमच्या स्पष्टीकरणात काही दोष/कमतरता आढळल्यास आम्हाला नक्की कळवावे आणि स्पष्टीकरण समाधानकारक असेल तर Comments मध्ये प्रोत्साहन द्यावे...)

 

चला तर मग...

१. संस्कृतवाक्य रचना करतांना - पुढील शब्द जर स्वराने सुरु होणारा असेल तर ‘म् अन्यथा व्यंजनाने सुरु होणारा असेल तर अनुस्वार...

 

सर्वप्रथम आपण म् कुठे करायचा ते पाहू...

उदा. १. रामः वनम् आगच्छति|

२. गणेशः चित्रम् ईक्षते|

३. नेहा फलम् आनयति|

वरील वाक्यात वनम्, चित्रम्, फलम् या सर्व शब्दांचा शेवट म् ने केला आहे कारण, त्यांच्या पुढे आलेले गच्छति, ईक्षते, नयति हे शब्द(क्रियापद) स्वरादि म्हणजे स्वराने सुरु होणारे आहेत....

 

आता, आपण अनुस्वार कुठे द्यायचा ते पाहू...

उदा. १. रामः वनं गच्छति|

२. गणेशः चित्रं पश्यति|

३. नेहा फलं नयति|

वरील वाक्यात वनं, चित्रं, फलं या सर्व शब्दांवर अनुस्वार दिला आहे कारण, त्यांच्या पुढे आलेले गच्छति, पश्यति, नयति हे शब्द व्यंजनाने सुरु होणारे आहेत....

थोडक्यात असे म्हणता येईल की...

...पुढील शब्द जर स्वराने सुरु होणारा असेल तर ‘म् अन्यथा व्यंजनाने सुरु होणारा असेल तर अनुस्वार...

 

२. या ठिकाणी म् अनिवार्य आहे -

अ. वाक्याचा शेवट करताना-

म्हणजे दंड(|)च्या आधीच्या शब्दात शेवटच्या अक्षरावर अनुस्वार असल्यास तिथे म् करावा.

 

उदा.

जलं विना जीवनम् अशक्यं| येथे अनुस्वार देणे अयोग्य आहे.

जलं विना जीवनम् अशक्यम्| हे बरोबर आहे.

 

आ. ‘तो’ एकटा असेल तर-

    एखाद्या वाक्यात एखादा शब्द अनुस्वारयुक्त आहे पण जेव्हा तुम्ही तो शब्द एकटा लिहिता तेव्हा मात्र त्या शब्दाच्या शेवटी अनुस्वारा ऐवजी ‘म्’ लिहावे.

जसे फळ्यावर (बोर्डवर) किंवा वहित लिहित असताना

उदा. अहं सत्वरं भोजनं करोमि|

यातील शब्द वहित किंवाळ्यावर शब्दार्थ किंवा काही निर्देश करताना एक-एकटे लिहिले तर अनुस्वार ऐवजी म् करावे.

 

जसे शब्दार्थ लिहिताना-

१. अहम् - मी

२. सत्वरम् – चटकन

३. भोजनम् – जेवण

४. करोमि – करतो

 

जसे शब्दरूप ओळखताना-

१. अहम् – अस्मद् या उत्तमपुरुषी, तिन्ही लिंगी समान सर्वनामाचे प्रथमा एकवचन

२. भोजनम् – भोजन या नपुं लिंगी नामाचे प्रथमा द्वितीय एकवचन. इ.

 

३. अन्वय लिहिताना-

    बऱ्याच वेळा असे लक्ष्यात आले आहे कि काही शिक्षक अन्वय लिहिताना प्रत्येक अनुस्वार युक्त शब्दाबद्दल म् देण्याचा अट्टाहास करतात. पण ते तर्कसंगत वाटत नाही. कारण अन्वय म्हणजे काय तर वाक्य रचना सरळ कर्ता- कर्म च्या क्रमाने करणे होय. म्हणून अन्वय लिहितानाही वाक्यारचनेच्या नियमांचे पालन व्हावेच. तिथे तो केवळ अन्वय आहे म्हणून प्रत्येक अनुस्वार युक्त शब्दाच्या ठिकाणी म् युक्त शब्द लिहिणे योग्य नाही.

 

तर... अश्याप्रकारे अनुस्वार कुठे आणि म् (हलन्त) कुठे? या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला समाधानकारक मिळाले असेल अशी अपेक्षा आहे.

जर तुम्हाला हे स्पष्टीकरण समजले/आवडले असेल तर कृपया आमच्या या ब्लॉगला Follow करा कि जेणे करून तुम्हाला अश्याच उपयोगी पोस्ट पुढेही वाचायला मिळतील....

 

आणि हो... ही पोस्ट तुम्हाला कशी वाटली ते Comments मध्ये  नक्की कळवा...

 

भेटू मग, पुढील पोस्ट मध्ये...

धन्यवाद!!!


Monday, June 22, 2020

एका वाक्यात उत्तर द्या- वाटते तितके सोपे नाही...

एका वाक्यात उत्तर द्या- वाटते तितके सोपे नाही...

होय बरोबर वाचलात तुम्ही... बऱ्याच विद्यार्थ्यांना असे वाटते कि एका वाक्यात उत्तरे द्या, म्हणजे अतिशय सोपा प्रश्न आहे... आणि ते घाई घाई मध्ये दिलेल्या परिच्छेदातील संपूर्ण ओळच उत्तरात लिहून मोकळे होतात आणि बरेच विद्यार्थी त्या प्रश्नाचा, हातातील गुण घालवून बसतात.....

 

नमस्कार विद्यार्थी मित्रांनो,

लक्ष्यवेध संस्कृत अकॅडेमीच्या या ब्लॉग वर तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे...

संस्कृत आमोद असो की आनंद, वर्ग ८वी ९वी असो किंवा १०वी असो सर्वच वर्गांना किंबहुना सर्वच विषयात, भाषा विषयात असा एक प्रश्न असतोच.. तो म्हणजे एका वाक्यात उत्तर लिहा. मित्रांनो, हा प्रश्न वाटतो तितका सोपा नाही बरं का..!! कळजी पूर्वक जर हा प्रश्न सोडवला तर मात्र या प्रश्नाचा आपला गुण जात नाही... तर, हा प्रश्न सोडवताना काय काळजी घ्यावी तेच आपण या पोस्ट मध्ये पाहणार आहोत...

पुढे जाण्याआधी एक छोटीशी विनंती... कृपया आमच्या या pageला Follow करा. जेणे करून तुम्हाला आमच्या अश्याच उपयोगी पोस्ट वाचायला मिळतील.

 

चला तर मग...

१. सर्वनाम टाळा 

 बऱ्याच वेळा असे पाहण्यात आले आहे की विद्यार्थी प्रश्नातील शब्द पाहतात आणि परिच्छेदातील ‘तो’ शब्द असलेली पूर्ण ओळच उत्तर म्हणून लिहितात. खरे पाहता हे योग्य नाही. प्रकरण त्या वाक्यात नामा ऐवजी सर्व नामाचा उपयोग केलेला असेल तर ते उत्तर योग्य ठरत नाही.

उदा. (पाठ क्र. १ )

 

प्र. - भूमाता स्त्रीरूपं धृत्वा कस्य पुरतः प्रकटिता अभवत्?

असा प्रश्न आला असताना उत्तर काय असेल?

परिच्छेदात दिल्याप्रमाणे-

 - भूमाता स्त्रीरूपं धृत्वा तस्य(?) पुरतः प्रकटिता अभवत्|

वरील उत्तर बरोबर आहे का?

नाही!!!   मग उत्तर काय असेल...

भूमाता स्त्रीरूपं धृत्वा पृथुवैन्यस्य पुरतः प्रकटिता अभवत्|

-कारण,  पहिल्या वाक्यात सर्वनाम होते आणि नंतर च्या वाक्यात सर्वनाम टाळून योग्य अश्या नामाचा उपयोग केला आहे. तुम्हाला ही हे लक्ष्यात ठेवायचे आहे की जर प्रश्नाचे उत्तर लिहिताना उत्तरात सर्वनाम आले असेल तर त्याठिकाणी योग्य त्या नामाचा उपयोग करावा... अन्यथा उत्तर चुकीचे ठरेल...

पहिला point कळला असेल अशी अपेक्षा आहे.

 

 

२. योग्य विभक्तीचा उपयोग –

एक वाक्यात उत्तर लिहित असताना उत्तर असलेल्या पदाची योग्य विभक्ति तुम्हाला करता आली पाहिजे..

उदा. (पाठ क्र. २)

प्र. केन क्षेत्रं गत्वा सस्यं खादितम्?

असा प्रश्न आला असता उत्तर काय असेल?

परिच्छेदाचा विचार करता-

मृगः क्षेत्रं गत्वा सस्यं अखादत्| हे उत्तर बरोबर आहे.

पण हे उत्तर, प्रश्नाच्या रचणे प्रमाणे नाही. म्हणून तुम्ही – केन या प्रश्नार्थक पदाचा विचार करता-

मृगेण क्षेत्रं गत्वा सस्यं खादितम्| असे उत्तर लिहिणे अपेक्षित आहे. कारण प्रश्नात केन हे पद तृतीय विभक्तित आहे, म्हणून उत्तर असलेले पदही तृतीयातच हवे. म्हणून उत्तर लिहित असताना योग्य विभक्ति लक्ष्यात आली पाहिजे

 

 

३. योग्य त्या विरामचिन्हांचा वापर करा-

एक वाक्यात उत्तर लिहित असताना योग्य विरामचिन्हांचा आवश्यक त्या ठिकाणी उपयोग करावा.

उदा. (पाठ क्र. ५)

वरील परिच्छेदावर आधारित,

कणादमहर्षिणा कस्मिन् ग्रन्थे परमाणोः व्याख्या कृता?

असा प्रश्न आला असता उत्तर कसे असेल?

महर्षिणा ‘वैशेषिकसूत्राणि’ इति स्वग्रन्थे परमाणोः व्याख्या कृता|

प्रश्नात आलेल्या कस्मिन् हे प जरी सप्तमी मध्ये आले असेल तरीही त्याचे उत्तर एकेरी अवतरण चिन्हात लिहावे आणि त्या नंतर इति हा अव्यय लिहावा. इति या अव्ययाचा उपयोग करत असताना नेहमी त्या आधीचा शब्द/वाक्य एकेरी किंवा दुहेरी अवतरण चिन्हात असतो. आणि महत्त्वाचे म्हणजे उत्तराच्या शेवटी दंड द्यायला विसरू नका.

 

मित्रांनो, एक वाक्यात उत्तर लिहित असताना वरील बाबींचा विचार नक्की करा आणि तसाच सराव करा. वर सांगितलेली सर्व माहिती तुम्हाला कळाली असेल अशी अपेक्षा आहे...

माहिती कळाली असेल तर आम्हाला comments मध्ये नक्की कळवा आणि पुढील पोस्ट तुम्हाला कोणत्या topic वर पाहिजे तेही सांगा..

 

भेटू मग, पुढील पोस्ट मध्ये...

धन्यवाद!!!