#Sanskrit_essay
Essay on diwali in sanskrit with marathi translation
संस्कृत निबंध - दीपावली - मराठी अर्थासह.
#Lakshyavedh_Sanskrit_Academy_Nanded #Sandeep_paitwar #PaitwarSir #sanskritGrammar # Sanskrit_grammar #EasySanskritGrammar #Sanskrit_Amodah #LearnSanskrit #संस्कृतव्याकरणम् #संस्कृतभाषा #१०वी_ संस्कृत_ महाराष्ट्रराज्य _बोर्ड #संस्कृतनिबंध #SanskritEssay
अनुस्वार कुठे आणि म् (हलन्त) कुठे?
संस्कृतवाक्यरचना करताना शब्दाच्या शेवटच्या अक्षरावर अनुस्वाराचे
उच्चारण आल्यास बऱ्याच विद्यार्थ्यांचा किंबहुना काही शिक्षकांचाही ‘येथे अनुस्वार
द्यायचा की... हलन्त (म्) करायचे?’ असा गोंधळ उडालेला मी पाहिला आहे. त्याच दुविधेचे समाधान करण्याचा प्रयत्न येथे केला
आहे....
नमस्कार
मित्रांनो,
लक्ष्यवेध संस्कृत अकॅडेमीच्या या ब्लॉग वर तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, आम्ही या ब्लॉगच्या माध्यमातून
सामान्यातिसामान्य विद्यार्थ्याला संस्कृतव्याकरण , वाक्यरचना, इ. संबंधी जे प्रश्न पडतात
त्यांचे समाधान करण्याचा प्रयत्न करत असतो... असाच एक प्रयत्न आज ही...
(कृपया, तज्ज्ञ शिक्षकांनी आमच्या स्पष्टीकरणात काही दोष/कमतरता आढळल्यास
आम्हाला नक्की कळवावे आणि स्पष्टीकरण समाधानकारक असेल तर Comments मध्ये प्रोत्साहन द्यावे...)
चला तर मग...
१. संस्कृतवाक्य रचना करतांना - पुढील शब्द जर
स्वराने सुरु होणारा असेल तर ‘म्’ अन्यथा व्यंजनाने सुरु होणारा असेल तर अनुस्वार...
सर्वप्रथम आपण म् कुठे करायचा ते पाहू...
उदा. १. रामः वनम् आगच्छति|
२. गणेशः चित्रम् ईक्षते|
३. नेहा फलम् आनयति|
वरील वाक्यात वनम्, चित्रम्, फलम् या सर्व
शब्दांचा शेवट ‘म्’ ने
केला आहे कारण, त्यांच्या पुढे आलेले आगच्छति, ईक्षते,
आनयति हे शब्द(क्रियापद) स्वरादि म्हणजे
स्वराने सुरु होणारे आहेत....
आता, आपण अनुस्वार कुठे द्यायचा ते पाहू...
उदा. १. रामः वनं गच्छति|
२. गणेशः चित्रं पश्यति|
३. नेहा फलं नयति|
वरील वाक्यात वनं, चित्रं, फलं या सर्व
शब्दांवर अनुस्वार दिला आहे कारण, त्यांच्या पुढे
आलेले गच्छति, पश्यति, नयति हे शब्द व्यंजनाने सुरु
होणारे आहेत....
थोडक्यात असे म्हणता येईल की...
...पुढील शब्द जर स्वराने सुरु होणारा असेल तर ‘म्’ अन्यथा व्यंजनाने सुरु होणारा
असेल तर अनुस्वार...
२. या ठिकाणी म्
अनिवार्य आहे -
अ. वाक्याचा
शेवट करताना-
म्हणजे दंड(|)च्या आधीच्या
शब्दात शेवटच्या अक्षरावर अनुस्वार असल्यास तिथे म् करावा.
उदा.
जलं विना जीवनम् अशक्यं| येथे अनुस्वार
देणे अयोग्य आहे.
जलं विना जीवनम् अशक्यम्| हे बरोबर आहे.
आ. ‘तो’ एकटा असेल तर-
एखाद्या
वाक्यात एखादा शब्द अनुस्वारयुक्त आहे पण जेव्हा तुम्ही तो शब्द एकटा लिहिता
तेव्हा मात्र त्या शब्दाच्या शेवटी अनुस्वारा ऐवजी ‘म्’ लिहावे.
जसे फळ्यावर (बोर्डवर) किंवा वहित लिहित असताना
उदा. अहं सत्वरं भोजनं
करोमि|
यातील शब्द वहित किंवा फळ्यावर शब्दार्थ किंवा काही निर्देश करताना एक-एकटे लिहिले तर अनुस्वार ऐवजी म् करावे.
जसे शब्दार्थ
लिहिताना-
१. अहम् - मी
२. सत्वरम् – चटकन
३. भोजनम् – जेवण
४. करोमि – करतो
जसे शब्दरूप ओळखताना-
१. अहम् – अस्मद्
या उत्तमपुरुषी, तिन्ही लिंगी समान सर्वनामाचे प्रथमा
एकवचन
२. भोजनम् – भोजन या नपुं लिंगी नामाचे प्रथमा द्वितीय एकवचन. इ.
३. अन्वय लिहिताना-
बऱ्याच वेळा असे लक्ष्यात आले आहे कि काही शिक्षक अन्वय
लिहिताना प्रत्येक अनुस्वार युक्त शब्दाबद्दल म् देण्याचा अट्टाहास करतात. पण ते
तर्कसंगत वाटत नाही. कारण अन्वय म्हणजे काय तर वाक्य रचना सरळ कर्ता- कर्म च्या
क्रमाने करणे होय. म्हणून अन्वय लिहितानाही वाक्यारचनेच्या नियमांचे पालन व्हावेच.
तिथे तो केवळ अन्वय आहे म्हणून प्रत्येक अनुस्वार युक्त शब्दाच्या ठिकाणी म् युक्त शब्द
लिहिणे योग्य नाही.
तर... अश्याप्रकारे अनुस्वार कुठे
आणि म् (हलन्त)
कुठे? या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला समाधानकारक मिळाले असेल
अशी अपेक्षा आहे.
जर तुम्हाला हे स्पष्टीकरण समजले/आवडले असेल तर कृपया
आमच्या या ब्लॉगला Follow करा कि जेणे
करून तुम्हाला अश्याच उपयोगी पोस्ट पुढेही वाचायला मिळतील....
आणि हो... ही पोस्ट तुम्हाला कशी वाटली ते Comments मध्ये नक्की कळवा...
भेटू मग, पुढील पोस्ट मध्ये...
धन्यवाद!!!
एका वाक्यात उत्तर द्या- वाटते तितके सोपे नाही...
होय बरोबर वाचलात तुम्ही... बऱ्याच विद्यार्थ्यांना असे वाटते कि एका वाक्यात उत्तरे द्या, म्हणजे अतिशय सोपा प्रश्न आहे... आणि ते घाई घाई मध्ये दिलेल्या परिच्छेदातील संपूर्ण ओळच उत्तरात लिहून मोकळे होतात आणि बरेच विद्यार्थी त्या प्रश्नाचा, हातातील गुण घालवून बसतात.....
नमस्कार विद्यार्थी मित्रांनो,
लक्ष्यवेध संस्कृत अकॅडेमीच्या या ब्लॉग वर तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे...
संस्कृत आमोद असो की आनंद, वर्ग ८वी ९वी असो किंवा १०वी असो सर्वच वर्गांना किंबहुना सर्वच विषयात, भाषा विषयात असा एक प्रश्न असतोच.. तो म्हणजे एका वाक्यात उत्तर लिहा. मित्रांनो, हा प्रश्न वाटतो तितका सोपा नाही बरं का..!! कळजी पूर्वक जर हा प्रश्न सोडवला तर मात्र या प्रश्नाचा आपला गुण जात नाही... तर, हा प्रश्न सोडवताना काय काळजी घ्यावी तेच आपण या पोस्ट मध्ये पाहणार आहोत...
पुढे जाण्याआधी एक छोटीशी विनंती... कृपया आमच्या या pageला Follow करा. जेणे करून तुम्हाला आमच्या अश्याच उपयोगी पोस्ट वाचायला मिळतील.
चला तर मग...
१. सर्वनाम टाळा –
बऱ्याच वेळा असे पाहण्यात आले आहे की विद्यार्थी प्रश्नातील शब्द पाहतात आणि परिच्छेदातील ‘तो’ शब्द असलेली पूर्ण ओळच उत्तर म्हणून लिहितात. खरे पाहता हे योग्य नाही. प्रकरण त्या वाक्यात नामा ऐवजी सर्व नामाचा उपयोग केलेला असेल तर ते उत्तर योग्य ठरत नाही.
उदा. (पाठ क्र. १ )
प्र. - भूमाता स्त्रीरूपं धृत्वा कस्य पुरतः प्रकटिता अभवत्?
असा प्रश्न आला असताना उत्तर काय असेल?
परिच्छेदात दिल्याप्रमाणे-
- भूमाता स्त्रीरूपं धृत्वा तस्य(?) पुरतः प्रकटिता अभवत्|
वरील उत्तर बरोबर आहे का?
नाही!!! मग उत्तर काय असेल...
भूमाता स्त्रीरूपं धृत्वा पृथुवैन्यस्य पुरतः प्रकटिता अभवत्|
-कारण, पहिल्या वाक्यात सर्वनाम होते आणि नंतर च्या वाक्यात सर्वनाम टाळून योग्य अश्या नामाचा उपयोग केला आहे. तुम्हाला ही हे लक्ष्यात ठेवायचे आहे की जर प्रश्नाचे उत्तर लिहिताना उत्तरात सर्वनाम आले असेल तर त्याठिकाणी योग्य त्या नामाचा उपयोग करावा... अन्यथा उत्तर चुकीचे ठरेल...
पहिला point कळला असेल अशी अपेक्षा आहे.
२. योग्य विभक्तीचा उपयोग –
एक वाक्यात उत्तर लिहित असताना उत्तर असलेल्या पदाची योग्य विभक्ति तुम्हाला करता आली पाहिजे..
उदा. (पाठ क्र. २)
प्र. केन क्षेत्रं गत्वा सस्यं खादितम्?
असा प्रश्न आला असता उत्तर काय असेल?
परिच्छेदाचा विचार करता-
मृगः क्षेत्रं गत्वा सस्यं अखादत्| हे उत्तर बरोबर आहे.
पण हे उत्तर, प्रश्नाच्या रचणे प्रमाणे नाही. म्हणून तुम्ही – केन या प्रश्नार्थक पदाचा विचार करता-
मृगेण क्षेत्रं गत्वा सस्यं खादितम्| असे उत्तर लिहिणे अपेक्षित आहे. कारण प्रश्नात केन हे पद तृतीय विभक्तित आहे, म्हणून उत्तर असलेले पदही तृतीयातच हवे. म्हणून उत्तर लिहित असताना योग्य विभक्ति लक्ष्यात आली पाहिजे
३. योग्य त्या विरामचिन्हांचा वापर करा-
एक वाक्यात उत्तर लिहित असताना योग्य विरामचिन्हांचा आवश्यक त्या ठिकाणी उपयोग करावा.
उदा. (पाठ क्र. ५)
वरील परिच्छेदावर आधारित,
कणादमहर्षिणा कस्मिन् ग्रन्थे परमाणोः व्याख्या कृता?
असा प्रश्न आला असता उत्तर कसे असेल?
महर्षिणा ‘वैशेषिकसूत्राणि’ इति स्वग्रन्थे परमाणोः व्याख्या कृता|
प्रश्नात आलेल्या कस्मिन् हे पद जरी सप्तमी मध्ये आले असेल तरीही त्याचे उत्तर एकेरी अवतरण चिन्हात लिहावे आणि त्या नंतर इति हा अव्यय लिहावा. इति या अव्ययाचा उपयोग करत असताना नेहमी त्या आधीचा शब्द/वाक्य एकेरी किंवा दुहेरी अवतरण चिन्हात असतो. आणि महत्त्वाचे म्हणजे उत्तराच्या शेवटी दंड द्यायला विसरू नका.
मित्रांनो, एक वाक्यात उत्तर लिहित असताना वरील बाबींचा विचार नक्की करा आणि तसाच सराव करा. वर सांगितलेली सर्व माहिती तुम्हाला कळाली असेल अशी अपेक्षा आहे...
माहिती कळाली असेल तर आम्हाला comments मध्ये नक्की कळवा आणि पुढील पोस्ट तुम्हाला कोणत्या topic वर पाहिजे तेही सांगा..
भेटू मग, पुढील पोस्ट मध्ये...
धन्यवाद!!!